maharashtra

म्हसवे येथे ट्रॅक्टर-ट्रॉली व लक्‍झरी बसच्या अपघातात प्रवासी जखमी

लक्झरी बसचालकावर गुन्हा दाखल

Passenger injured in tractor-trolley and luxury bus accident at Mhaswe
पुणे-बेंगलोर महामार्गावर म्हसवे गावच्या हद्दीत डी-मार्ट जवळ लक्झरी बस रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर-ट्रॉली ला आदळून झालेल्या अपघातामध्ये लक्झरी मधील प्रवासी जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर म्हसवे गावच्या हद्दीत डी-मार्ट जवळ लक्झरी बस रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर-ट्रॉली ला आदळून झालेल्या अपघातामध्ये लक्झरी मधील प्रवासी जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
अविष्कार संजय सकटे राहणार वासरं खोपोली तालुका जिल्हा रायगड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरीफ उद्दीन येत गाव तालुका कडेगाव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार फिर्यादी आणि त्याचे वडील तसेच लक्झरी बस मध्ये 30 ते 35 प्रवासी सातार्‍याच्या दिशेने जात होते. त्यावेळी लक्झरी चालक मुलानी याने रस्त्याचा अंदाज न घेता अत्यंत वेगाने लक्झरी दामटली. म्हसवे गावच्या हद्दीमध्ये उसाने भरलेल्या ट्रॉलीला बसची मागून जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातांमध्ये फिर्यादीच्या दोन्ही पायांना गुडघ्यांना आणि डोक्याला जोरदार मार लागला. तसेच फिर्यादीचे वडील जखमी झाले. लक्झरी मधील इतरही प्रवाशांना जोरदार मार बसून ते जखमी झाले. सातारा तालुका पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.