सध्या महाराष्ट्रासह देशभरात लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. राज्यातील बाजारात लिंबाचे भाव 350 रुपये किलोवर पोहोचले आहे. लिंबाचे दर अचानक का वाढले? जाणून घेऊ या..
सदर बाजार येथील व्यवसायिक इमारतीमध्ये प्रदर्शन भरलेले असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील 50 हजार रुपये रोख व 25 हजार रुपयांचा मोबाईल असा 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी हेमा घनश्याम भाई टेकवाणी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माझा नंबर आधी असताना माझ्या रिक्षा पुढे तुझी रिक्षा का लावली, या उद्भवलेल्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मुनव्वर सय्यद यांनी सुनील बबन आवळे राहणार बुधवार नाका याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुलीच्या ऑपरेशनला पैसे न दिल्याच्या रागातून सासर्याने जावयाला दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना सातारा शहरालगतच्या खेड उपनगरामध्ये घडली आहे. याप्रकरणी दिगंबर सदाशिव ढावरे (वय 39, राहणार वैशाली निवास, जय मल्हार सोसायटी) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोमजाई नगर येथील १७ वर्षाच्या सावत्र मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सावत्र पित्यास अटक केली आहे.
वादग्रस्त विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी मुंबई येथून अटक केले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सातारा पोलिसांनी त्यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. शेडगे यांच्यासमोर हजर केले असता दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्तेंचा साताऱ्यातील मुक्काम वाढला आहे.
कोरेगाव मधील श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 31 कोटी रुपयांच्या अपहार व फसवणूक प्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संचालक असलेल्या संजय हिरालाल गांधी (वय 58, रा. नवीन एसटी स्टँडजवळ, कोरेगाव) याला अटक केली. दरम्यान, संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
सातारा एमआयडीसीमधून अज्ञात चोरट्याने 2 लाख 81 हजार 619 रुपये किंमतीचे 590 किलो वजनाचे कॉपर केबल बंडल चोरुन नेले.
सातारा एमआयडीसीमधून अज्ञात चोरट्याने 2 लाख 81 हजार 619 रुपये किंमतीचे 590 किलो वजनाचे कॉपर केबल बंडल चोरुन नेले.
शाहूनगर येथे अज्ञाताने किराणा दुकानातून मोबाईल चोरुन नेला असून चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.