सदर बाजार येथील व्यवसायिक इमारतीमध्ये प्रदर्शन भरलेले असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील 50 हजार रुपये रोख व 25 हजार रुपयांचा मोबाईल असा 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी हेमा घनश्याम भाई टेकवाणी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सातारा : सदर बाजार येथील व्यवसायिक इमारतीमध्ये प्रदर्शन भरलेले असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील 50 हजार रुपये रोख व 25 हजार रुपयांचा मोबाईल असा 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी हेमा घनश्याम भाई टेकवाणी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता हेमा टेकवाणी या कनिष्क हॉल येथे भरलेल्या रंगोली एक्झिबिशन मध्ये सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्या स्टॉल मधील बॅगमधून अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपये रोख आणि मोबाईल असा मुद्देमाल हातोहात लांबवला. पोलीस हवालदार मेचकर अधिक तपास करत आहेत.


