कोल्हापूर शहराच्या पहिला महिला आमदार व काँग्रेसचे दिवंगत आमदार कै.स्व.चंद्रकांत जाधव आण्णा यांच्या पत्नी श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांची कोल्हापूर उत्तर विधानसभा आमदार पदी निवड झाली आहे. या निवडणुकीत खटावचे राष्ट्रीय काँग्रेस युवा नेते व हरणाई उद्योग समूहाचे सर्वसर्वा रणजितसिंह देशमुख यांनी पक्ष निरीक्षक म्हणून चोख कामगिरी केली. त्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
सातारा : कोल्हापूर शहराच्या पहिला महिला आमदार व काँग्रेसचे दिवंगत आमदार कै.स्व.चंद्रकांत जाधव आण्णा यांच्या पत्नी श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांची कोल्हापूर उत्तर विधानसभा आमदार पदी निवड झाली आहे. या निवडणुकीत खटावचे राष्ट्रीय काँग्रेस युवा नेते व हरणाई उद्योग समूहाचे सर्वसर्वा रणजितसिंह देशमुख यांनी पक्ष निरीक्षक म्हणून चोख कामगिरी केली. त्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. यानिमित्त खटाव तालुक्यात आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागणार आहे. स्वाभिमानी कोल्हापूर मतदार महिलांनी भाजपने दिलेले गिफ्ट भिरकावून दिले. त्याच वेळी निकाल समजला होता. पण, भाजपने गिरेगा तो भी कमळ उपर रहेगा, असा अपप्रचार केला होता. अखेर अंतिम निकालाने चित्र स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीतील निरीक्षक व निमसोड ता. खटावचे सुपुत्र रणजितसिंह देशमुख यांनी चांगली जबाबदारी पार पाडली आहे. दि २ मार्च पासून स्वतः श्री देशमुख यांनी उत्तर कोल्हापूर मतदारसंघ पिंजून काढला होता. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आणि समविचारी पक्षाशी समनव्य साधून प्रचाराची यंत्रणा राबवली होती. तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, राज्यमंत्री सतेज पाटील व मान्यवरांच्या सुचनेचे तंतोतंत पालन केले. त्यांनी प्रचारात आखलेली व्यहुरचना यशस्वी ठरली आहे. त्याचे वरिष्ठ नेत्यांनी कौतुक केले आहे. युवा नेते रणजितसिंह देशमुख यांच्या प्रयत्नाला यश मिळाल्याने आता काही महाभाग हे हिमालयात जाण्यापेक्षा थेट मध्यल्यात गेल्याची विनोदाने चर्चा होऊ लागली आहे.


