maharashtra

सुमारे 31 कोटी रुपयांच्या अपहार व फसवणूक प्रकरणी संजय गांधी यांना अटक


Sanjay Gandhi arrested for embezzlement of Rs 31 crore
कोरेगाव मधील श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 31 कोटी रुपयांच्या अपहार व फसवणूक प्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संचालक असलेल्या संजय हिरालाल गांधी (वय 58, रा. नवीन एसटी स्टँडजवळ, कोरेगाव) याला अटक केली. दरम्यान, संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

सातारा : कोरेगाव मधील श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 31 कोटी रुपयांच्या अपहार व फसवणूक प्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संचालक असलेल्या संजय हिरालाल गांधी (वय 58, रा. नवीन एसटी स्टँडजवळ, कोरेगाव) याला अटक केली. दरम्यान, संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरेगाव मधील श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेत अनियमितता आढळल्याने लेखापरीक्षक यांनी विविध कलमान्वये कोरेगाव पोलिस ठाण्यात 2019 मध्ये चेअरमनसह एकूण 13 जणांवर अपहार, फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. अपहाराची रक्कम 30 कोटी 78 लाख %4 हजार 306 रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या पतसंस्थेत हजारो ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या. मात्र पतसंस्थेत घोळ झाल्याने ठेवीदार अस्वस्थ झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ तपास करुन त्यांना न्याय मिळेल अशी आशा ठेवीदारांना लागली होती.
कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिकचे पथक संशयितांचा शोध घेत होते. मात्र संशयित पोलिसांच्या हातावर तुरी देत होते. श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेचा संचालक असलेला संजय गांधी याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने जावून कारवाई करत गांधीला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलिस कोठडी मिळाली.