माझा नंबर आधी असताना माझ्या रिक्षा पुढे तुझी रिक्षा का लावली, या उद्भवलेल्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मुनव्वर सय्यद यांनी सुनील बबन आवळे राहणार बुधवार नाका याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सातारा : माझा नंबर आधी असताना माझ्या रिक्षा पुढे तुझी रिक्षा का लावली, या उद्भवलेल्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मुनव्वर सय्यद यांनी सुनील बबन आवळे राहणार बुधवार नाका याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार सय्यद हे बुधवार नाक्यावर आपली रिक्षा लावून फ्रेश होण्यासाठी घरी गेले होते. ते माघारी परतले असता त्यांच्या रिक्षा समोर आवळे यांनी आपली रिक्षा लावली होती. तू माझ्या रिक्षापुढे स्वतःची रिक्षा का लावली, यावरून दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. प्रकरण हातघाईला जाऊन दोघांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. त्यावेळी आवळे याने रिक्षातील लोखंडी रोड काढून मुनव्वर यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे मुनव्वर सय्यद गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


