खेड परिसरात मजुराला चौघांकडून बेदम मारहाण
मुलीच्या ऑपरेशनला पैसे न दिल्याच्या रागातून केले कृत्य
मुलीच्या ऑपरेशनला पैसे न दिल्याच्या रागातून सासर्याने जावयाला दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना सातारा शहरालगतच्या खेड उपनगरामध्ये घडली आहे. याप्रकरणी दिगंबर सदाशिव ढावरे (वय 39, राहणार वैशाली निवास, जय मल्हार सोसायटी) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सातारा : मुलीच्या ऑपरेशनला पैसे न दिल्याच्या रागातून सासर्याने जावयाला दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना सातारा शहरालगतच्या खेड उपनगरामध्ये घडली आहे. याप्रकरणी दिगंबर सदाशिव ढावरे (वय 39, राहणार वैशाली निवास, जय मल्हार सोसायटी) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र वैराट यांनी आपल्या मुलीच्या ऑपरेशन साठी दिगंबर ढावरे यांना ऑपरेशन साठी लवकरात लवकर पैसे जमवा, असे सांगितले. तेव्हा माझ्याकडे पैसे अद्याप उपलब्ध नाहीत. नंतर मी तिचे ऑपरेशन करतो, असे उत्तर जावई दिगंबर डावरे यांनी दिले. या रागातून संशयितांनी संगनमताने ढावरे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून डोळ्यात चटणी टाकून त्यांना जखमी केले. हवालदार सपकाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.


