बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी शुक्रवार पेठेतील एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी शुक्रवार पेठेतील एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
हा अपघात म्हसवे तालुका सातारा येथील पूजा पेट्रोल पंपाजवळ 9 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता घडला याप्रकरणी सागर अविनाश शिवनामे वय 22 राहणार कोटेश्वर डुप्लेक्स शुक्रवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवनामे त्याच्या मित्रांसमवेत विगो कंपनीच्या मोपेड वरून जात असताना संशयिताने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल अविचाराने बेदरकारपणे चालवून अपघात केला. या अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटील अधिक तपास करत आहेत.


