सातारा वनविभागाने सुरु केलेल्या नाईट सफारीला आता कोर्टात आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या माध्यमातून आव्हान मिळणार आहे. नाईट सफारीच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकांचा फायदा करून देणाऱ्या या योजनेवर पर्यावरणप्रेमींनी तीव्र नापसंती नोंदवली आहे.
सातारा शहर व सातारारोड येथे झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
येथील पंताचा गोट परिसरातील राणी दिलीप शिंदे (रा. गिते बिल्डींग,पंताचा गोट,सातारा) यांना जुन्या भांडणाच्या रागातून दमदाटी केल्याने अकबर युसुफ फकीर (रा.पंताचा गोट,सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.
जबरी चोरी प्रकरणी सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका संशयीताच्या मुसक्या आवळून त्यास अटक केली आहे. सोमनाथ सुरेश चौगुले (वय 24 रा. देगाव, ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
सातारा एसटी स्टँड शेजारी असणार्या सेव्हनस्टार इमारतीमध्ये एकावर ब्लेडने वार झाल्याची घटना घडली. हल्लेखोरास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्याविषयी विकृत व विडंबनात्मक पोस्ट सोशल मिडियावर करुन सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर तात्काळ गुन्हा दाखल करून तिला अटक करावी, अशी मागणी उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केली.
अरुण गोडबोले या आमच्या मित्राने जेव्हा परदेश प्रवास म्हणजे वायफट, ख्रार्चिक, चैन मानला जायचा. त्या काळी १९८३ ला सिंगापूर, मनिला, हाँगकाँग व बँकॉक या चार शहरांचा प्रवास केला आणि नंतर त्याचे रसिले वर्णन लिहून आम्हा वाचकांना घरबसल्या त्याचा आनंद मिळवून दिला आहे. हे पुस्तक म्हणजे प्रवासाची बखर नाही तर तेथील स्थळे, माणसे, त्यांचे स्वभाव व घडलेले मनोरंजक किस्से याचे रंजनात्मक स्वरूप आहे.
जरा आजूबाजूच्या फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यात जाऊन बघा, तिथल्या आणि इथल्या परिस्थितीत किती फरक आहे? गेली दोन दशके फलटणची जनता राष्ट्रवादीला कौल देत आहे, पण चार वेळा सत्तेत असून ही राष्ट्रवादीला फलटण तालुक्याचा विकास करता आला नाही, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
दिव्यांगांना त्यांचे हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचे दुष्कृत्य काही अधिकारी करीत आहेत. मात्र, दिव्यांगांना त्यांचे अधिकार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी केले.
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सातारा येथे घडली.