अरुण गोडबोले या आमच्या मित्राने जेव्हा परदेश प्रवास म्हणजे वायफट, ख्रार्चिक, चैन मानला जायचा. त्या काळी १९८३ ला सिंगापूर, मनिला, हाँगकाँग व बँकॉक या चार शहरांचा प्रवास केला आणि नंतर त्याचे रसिले वर्णन लिहून आम्हा वाचकांना घरबसल्या त्याचा आनंद मिळवून दिला आहे. हे पुस्तक म्हणजे प्रवासाची बखर नाही तर तेथील स्थळे, माणसे, त्यांचे स्वभाव व घडलेले मनोरंजक किस्से याचे रंजनात्मक स्वरूप आहे.
सातारा : अरुण गोडबोले या आमच्या मित्राने जेव्हा परदेश प्रवास म्हणजे वायफट, ख्रार्चिक, चैन मानला जायचा. त्या काळी १९८३ ला सिंगापूर, मनिला, हाँगकाँग व बँकॉक या चार शहरांचा प्रवास केला आणि नंतर त्याचे रसिले वर्णन लिहून आम्हा वाचकांना घरबसल्या त्याचा आनंद मिळवून दिला आहे. हे पुस्तक म्हणजे प्रवासाची बखर नाही तर तेथील स्थळे, माणसे, त्यांचे स्वभाव व घडलेले मनोरंजक किस्से याचे रंजनात्मक स्वरूप आहे. एकदा वाचायला सुरुवात केली कि ते सोडवत नाही" असे मत प्रसिद्ध व्यापारी किशोर नावंधर यांनी व्यक्त केले.
सातारा ते सिंगापूर पुस्तकाच्या तिसरया आवृत्तीचे लोकार्पण अरुण गोडबोले यांनी मित्रांच्या समवेत अनौपचारिकरीत्या केले तेव्हा नावंधर बोलत होते.
गेली २०-२२ वर्षे सकाळी जॉगिंग, चालणे वगैरे थोडा व्यायाम करून ज्या लक्ष्मी भुवन या हॉटेलात जमतो तिथेच हे लोकार्पण मित्रांच्या हस्ते करण्यामागील गोडबोले यांची कल्पकता विशेष आहे" असेही नावंधर पुढे म्हणाले.
अरुण गोडबोले यांनी यावेळी तेव्हाच्या ग्रुपच्या कालवश झालेल्या मित्रांच्या आठवणी सांगून गेली अनेक वर्षे आपण मित्र सकाळी जेथे
जमून थोड्या गप्पा मारतो, थोडी चेष्टामस्करी करतो व नवीन उर्जा मिळवतो त्या लक्ष्मी भुवन व त्यांचे चालक झेपले कुटुंबीय यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथे लोकार्पण करण्याची कल्पना सुचली असे सांगून या व अन्य पुस्तकांना उदंड प्रतिसाद देणाऱ्या वाचकांचे आभार मानले.
यावेळी राजाराम झेपले, डॉ अच्युत गोडबोले, प्रा.अविनाश लेवे, विनोद झंवर, कन्हैयालाल, देवी व प्रदीप भट्टड हे उपस्थित होते.


