maharashtra

सेव्हनस्टार इमारतीमध्ये एकावर ब्लेडने वार


One attack with a blade in the Sevenstar building
सातारा एसटी स्टँड शेजारी असणार्‍या सेव्हनस्टार इमारतीमध्ये एकावर ब्लेडने वार झाल्याची घटना घडली. हल्लेखोरास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा : सातारा एसटी स्टँड शेजारी असणार्‍या सेव्हनस्टार इमारतीमध्ये एकावर ब्लेडने वार झाल्याची घटना घडली. हल्लेखोरास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा एसटी स्टँड शेजारी असणार्‍या सेव्हनस्टार इमारतीमध्ये अज्ञात युवकाने ब्लेडच्या सहाय्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीसांनी तात्काळ सबंधीत युवकास ताब्यात घेतले असुन. या घटनेमागचे  नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. ज्या अन्य इसमावर वार झाला आहे त्याला खाजगी रूग्णालयात उपचारर्थ दाखल करण्यात आले असल्याची घटनास्थळावरून माहिती मिळाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एसटी स्टँड परिसरात एकच खळबळ माजली. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.