जबरी चोरी प्रकरणी सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका संशयीताच्या मुसक्या आवळून त्यास अटक केली आहे. सोमनाथ सुरेश चौगुले (वय 24 रा. देगाव, ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
सातारा : जबरी चोरी प्रकरणी सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका संशयीताच्या मुसक्या आवळून त्यास अटक केली आहे. सोमनाथ सुरेश चौगुले (वय 24 रा. देगाव, ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 मे 2022 रोजी दुपारच्या सुमारास वनवासवाडी ता. जि. सातारा हद्दीतील एम.आय.डी.सी. परिसरातून एक युवक पायी चालत कामावर जात असताना अचानकपणे पाठीमागून एका चोरट्याने त्यास पकडून त्याच्या जवळील मोबाईल व पैसे जबरीचे लुटून नेले होते. त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
या चोरट्याचा शोध घेण्याबाबतच्या सुचना सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, सहा. पोलीस अधीक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोर यांना दिल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्यपूर्ण रितीने तपास करत संशयीत इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असताना त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेला मोबाईल व पैसे चोरट्याकडून हस्तगत करण्यात शहर पोलीसांना यश मिळाले आहे. अन्य काही गुन्ह्याची उकल त्याच्याकडून होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी दिली.
या कारवाईत सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय सावळे, पो. कॉ. संतोष कचरे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, सागर गायकवाड यांनी सहभाग घेतला.


