दिव्यांगांना त्यांचे हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचे दुष्कृत्य काही अधिकारी करीत आहेत. मात्र, दिव्यांगांना त्यांचे अधिकार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी केले.
सातारा : दिव्यांगांना त्यांचे हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचे दुष्कृत्य काही अधिकारी करीत आहेत. मात्र, दिव्यांगांना त्यांचे अधिकार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी केले.
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचा नुकताच वर्धापनदिन पार पडला. त्यावेळी अजय पवार बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष शैलेंद्र बोर्डे, सचिव हरिभाऊ साळुंखे, सदस्य रेश्मा जाधव, रवींद्र गाडे,
आनंदा पोतेकर, प्रहार तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, संतोष आवकीकर, धर्माजी कांबळे, अनिता कडव, शारदा जाधव, दुर्योधन बाबर, शैलेंद्र सावंत, श्रावण पैलवान, शुभम जाधव, अजय जाधव, अनिल बेडेकर, संजय प्रकाश, कोरेगाव तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे, सुनिता ओंबळे, ज्ञानेश्वर ओंबळे, दशरथ लोखंडे, सोपान डफळ, तेजस कुंभार, रूपाली कांबळे, अक्षय बाबर, वैष्णवी चौगुले, अनिल ढेप विस्तार अधिकारी सातारा, अमर वाघ विस्तार अधिकारी वाई, भूषण मोरे, गणेश कीर्तने, बाळू ओव्हाळ, मंदा गाडे, समीना शेख, दिपाली काळभोर यांची उपस्थिती होती.
अजय पवार पुढे म्हणाले, समाजात दिव्यांगांना उपेक्षेने वागविले जात आहे. ही मानसिकता बदलणे गरजेची आहे. समाजाचा एक घटक म्हणून दिव्यांगांसाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. मात्र या योजनांचा फायदा तळागाळातील दिव्यांगांपर्यंत पोहोचतच नाही. कित्येक सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी बांधण्यासाठी सांगितलेले रॅम्प आजपावेतो अस्तित्वातच नाहीत. त्याठिकाणी आपल्या कामासाठी जाणार्या दिव्यांगांना रांगतच जावे लागत आहे. दिव्यांगांबाबत असणारी अधिकार्यांची उदासिनता दिव्यांगांमध्ये रोष उत्पन्न करणारी आहे. दिव्यांग सामाजिक प्रेरणा संस्था स्थापनेसाठी आणि दिव्यांग हितासाठी, दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झटणार्या सर्व पदाधिकारी, सदस्य, आणि सर्व दिव्यांग बधु व भगिनींचे मी आभार मानतो. संस्थेमुळे अनेक दिव्यांगांना न्याय मिळाला आहे. संस्थेने अनेक सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. या उपक्रमांमध्ये दिव्यांग बधु व भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरुप घाडगे यांनी केले, तर आभार आनंदा पोतेकर यांनी मानले.