राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्याविषयी विकृत व विडंबनात्मक पोस्ट सोशल मिडियावर करुन सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर तात्काळ गुन्हा दाखल करून तिला अटक करावी, अशी मागणी उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केली.
सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्याविषयी विकृत व विडंबनात्मक पोस्ट सोशल मिडियावर करुन सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर तात्काळ गुन्हा दाखल करून तिला अटक करावी, अशी मागणी उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केली.
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने ट्विटर, फेसबुकवर एक विकृत कविता पोस्ट केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये लोकविकासाची कामे केली आहेत. अनेक धोरणात्मक निर्णय घेवून महाराष्ट्राचा विकास करताना देशाला वेगळा पॅटर्न देणाऱ्या महाराष्ट्राचे ते शिल्पकार आहेत. केतकी चितळे हिने पवारसाहेबांवर विकृत विडंबनात्मक कविता करुन तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वीही आक्षेपार्ह वक्तव्य करुन सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशा पोस्ट केल्यामुळे या केतकी चितळेवर गुन्हे दाखल आहेत. अशा प्रवृत्ती समाजाला घातक असून केतकी चितळे हिच्याविरुध्द तात्काळ गुन्हा दाखल करावा. पवार हे तिच्या आजोबांच्या वयाचे आहेत, हे ती विसरली आहे. तिच्यावर गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी. तसेच ज्या ऍड. भावे यांनी कविता लिहली आहे त्यांनाही अटक करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


