फलटण तालुक्याचा विकास झाला नाही; भर सभेत अजित पवारांची कबुली
बारामती तालुक्यातील सभेमध्ये फटकेबाजी : फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यांचे वास्तव आले समोर
जरा आजूबाजूच्या फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यात जाऊन बघा, तिथल्या आणि इथल्या परिस्थितीत किती फरक आहे? गेली दोन दशके फलटणची जनता राष्ट्रवादीला कौल देत आहे, पण चार वेळा सत्तेत असून ही राष्ट्रवादीला फलटण तालुक्याचा विकास करता आला नाही, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
बारामती : शरद पवार पुण्यात शिकायला होते, तेव्हा बारामतीहून एसटीने डबा जायचा. तो पोहोचेपर्यंत डबा खराब व्हायचा. आता तशी परिस्थिती राहिलीय का? आपल्या भागाचा विकास झाला आहे. जरा आजूबाजूच्या फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यात जाऊन बघा, तिथल्या आणि इथल्या परिस्थितीत किती फरक आहे? गेली दोन दशके फलटणची जनता राष्ट्रवादीला कौल देत आहे, पण चार वेळा सत्तेत असून ही राष्ट्रवादीला फलटण तालुक्याचा विकास करता आला नाही, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. पण यामुळे उघड झालेली वास्तव फलटणचे लोकप्रतिनिधी स्वीकारणार आहेत का ? हाच खरा सवाल आहे.
फलटण, दौंड, इंदापूर तालुके विकासात मागे का राहिले? असे भर सभेत बोलता बोलता खुद्द अजितदादा पवार यांच्या तोंडातून आले. त्याचे कारण काहीसे असेच होते. दादांची जाहीर सभा सुरू असतानाच कार्हाटीच्या शाळेत जाण्यासाठी बस सुरु करा, अशी मागणी भिलारवाडी येथील कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
आता ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना (शरद पवार) कंडक्टर करतो, आणि सुप्रियाला तिकिट काढायला लावतो, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्याची फिरकी घेतली. अरे बाबा आधीची परिस्थिती बघ, आत्ताची बघ, परिस्थिती बदलत चालली आहे, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्याला सुनावले.
तर शरद पवार पुण्यात शिकायला होते, तेव्हा बारामतीहून एसटीने डबा जायचा. तो पोहोचेपर्यंत डबा खराब व्हायचा. आता तशी परिस्थिती राहिलीय का? आपल्या भागाचा विकास झाला आहे. जरा आजूबाजूच्या फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यात जाऊन बघा, तिथल्या आणि इथल्या परिस्थितीत किती फरक आहे? असा सवाल अजितदादा पवार यांनी केला मात्र यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादीकडून या तालुक्यांचा विकास झाला नाही अशी कबुली त्यांनी दिली आहे.
यावेळी योजनांद्वारे मिळणाऱ्या पाण्यांचे दर कमी करा, अशी मागणी एका कार्यकर्त्याने केल्यावर दुसऱ्याने लागलाच तो विषय पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर पवार यांनी यातल्या एकाला खासदार अन् एकाला आमदार करा, यांना वाटतं आम्ही काहीचं काम करत नाही, अशा शब्दांत त्यांची हजेरी घेतली.
झाकली मूठ सव्वा लाखाची राहू दे’
ये बाबा गप्प बस ना. झाकली मूठ सव्वा लाखाची राहू दे’
बारामतीला किती निधी आला आहे ते बघा. आता किती निधी आला त्याचा आकडा मी सांगत नाही. नाही तर माध्यमात ‘ब्रेकिंग’ सुरु होईल, असे अजित पवार म्हणाले, त्यावर एकाने लागलीच किती निधी आला ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर पवार यांनी ‘ये बाबा गप्प बस ना. झाकली मूठ सव्वा लाखाची राहू दे’, अशी मिश्किल टिपण्णी केली.त्यांनी फक्त बारामतीचा विकास साधला अशी चर्चा
पवार कुटुंबाने सत्तेचा वापर फक्त बारामतीसाठी केला मात्र, भरघोस मताने राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून देणारे शेजारचे तालुके मात्र विकासाविना भकास केले. याचे वास्तव आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भाषणातून समोर आल्यानंतर फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू असून या सभेची वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर या तीनही तालुक्यात मध्ये त्यांनी फक्त बारामतीचा विकास साधला अशी चर्चा जनतेमध्ये सुरू झाली आहे.तरीही फलटण तालुक्याचा विकास नाही
गेली दोन दशके फलटणची जनता राष्ट्रवादीला कौल देत आहे, पण चार वेळा सत्तेत असून ही राष्ट्रवादीला फलटण तालुक्याचा विकास करता आला नाही. सातारा लोकसभेला राष्ट्रवादीचे दोन खासदार, माढा लोकसभेला- २००९ ते २०१४ खुद्द शरद पवार, २०१४ ते २०१९ म्हणजेच लोकसभा दोन टर्म तरीही फलटण तालुक्याचा विकास नाही, याची स्पष्ट कबुली अजित पवारांनी दिली आहे.