शहीद प्रथमेश पवार यांना बामणोली तर्फकुडाळ येथे आज सकाळी साश्रूपुर्ण नयनांनी जावलीकरांच्या वतीने अखेरचा निरोप देण्यात आला. जावली तालुक्यातून हजारोंच्या सख्येंने नागरिकांनी गर्दी करीत जावली तालुक्याच्या सुपूत्राला अखेरचा निरोप दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद प्रथमेश पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली.
फलटण तालुक्यातील कापशी- आळजापूर चौक येथे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना रविवार, दि.22 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
सध्या खूपच उष्ण वातावरण आहे. माणसांबरोबरच प्राणीमात्रावर देखील या उष्णतेचा परिणाम होत आहे. उष्णतेमुळे बऱ्याच भागांमधील पाणी पूर्णंत: आटले आहे. त्याचा परिणाम म्हणून जंगलामध्ये पाण्याचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे प्राणी आता पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत.
निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात केवळ दोनच अपत्य असल्याचे नमूद करून भरत बोडरे यांनी मतदारांची व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याची तक्रार प्रतिस्पर्धी उमेदवार विश्वास अण्णा शिरतोडे यांनी लोणंद पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे झालेल्या सभेत अफझल खान कबरीसंदर्भात वक्तव्य केल्याने सातारा पोलीस ऍलर्ट झाले असून प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्या कबरीला पोलीस संरक्षण वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय पिछडावर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन मुक्ती पार्टी च्या समर्थनार्थ सातारा येथे विशाल प्रबोधन संमेलन पार पडले. ओ.बी.सी.ची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे. तसेच कायमस्वरूपी आरक्षणाच्या मागणीसाठी दि. २५ मे रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे.
नांदगाव, तालुका कराड येथे वनवा लावून वनसंपदेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने सुभाष शामराव पाटील यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच वेगवेगळ्या पद्धतीची एक हजार झाडे लागवड करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. विराणी कराड यांनी हे आदेश दिले.
वादळी वार्यासह माण-म्हसवडच्या बहुतांश भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या जोरदार विजेच्या कडकडाटात हिंगणी, ता. माण येथील शुभम सरतापे या 23 वर्षीय युवकाला तसेच गोठ्यातील म्हैशीला विजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सातारा शहरातील सराफाच्या दुकानातून महिलेचे पंधरा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम चे सोन्याचे गंठण व तीन ग्रॅम वजनाचे मणी असा पंधरा हजाराचा मुद्देमाल अज्ञातांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या दरम्यान घडली. ही घटना वर्धमान ज्वेलर्स शनिवार पेठ येथे घडली आहे.
वेगवेगळ्या कारणांवरून विवाहितेचा छळ करून तिला त्रास दिल्याप्रकरणी संबंधित विवाहितेच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये जाचहाट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनाली राहुल शिंदे वय 31 राहणार धर्मवीर नगर संभाजी नगर संपदा हौसिंग सोसायटी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.