कांगा कॉलनी सातारा येथे 64 वर्षे वृध्दाचा घरात नारळ पाणी पिताना धाप लागल्याने अचानक मृत्यू झाला. महेश मोहनराव इथापे असे मृताचे नाव आहे. ही घटना 20 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली.
राज्यात महाविकास आघाडी सरकार च्या नाकारते पणामुळे ओबीसी आरक्षण हिरावले गेले आहे. हा मुद्दा राज्यात मागील अनेक दिवसान पासुन पेटला असुन महाविकास आघाडी सरकार याकडे लक्ष केंन्द्रीत करत नसल्याने सातारा येथे भाजपा व ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार च्या विरोधात जोरदार प्रदर्शन व रास्तारोको करुन राज्यात ओबीसी आरक्षण तात्काळ लागु करण्याची मागणी केली आहे.
पुणे शहरातील ऐतिहासिक लाल महल या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व असून महाराष्ट्रातील संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य मोठे आहे. येथे चित्रीकरण कसे झाले? मुळात लाल महल आणि त्याचा अंतर्गत भाग ही चित्रीकरणाची जागा नाही याचे भान संबंधितांनी ठेवायला हवे. तसेच संबंधित चित्रीकरण सिनेमात वापरण्यात येऊ नये.
पुणे जिल्ह्यातील विहम (ता. खेड) येथे आढळून आलेली १५ ते १८ व्या शतकातील तांब्याची १४७ नानी पुणे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांच्याकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आली.
श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात विनाकारण बदनामी करणारे अमर रघुनाथ पाटील राहणार शिवाजीनगर पुणे व चंद्रकांत गणपत पाठक राहणार त्रंबकेश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गुरू पिठाच्या वतीने साताऱ्यात हनुमंत लांडे, राजेश पवार आणि महेंद्र बाजारे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
सातारा शहरातील 85 पैकी 70 ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेसाठी वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स तैनात असून येत्या 30 मे पर्यंत ही सर्व कामे तातडीने पूर्ण केली जातील, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली. ओढ्याचे पाणी तुंबून कुठे घराचे नुकसान होणार नाही या पद्धतीने सफाई मोहिमेमध्ये त्या पद्धतीने काम केले जात आहे.
जगाच्या पाठीवर दोनशेहून अधिक देश आहेत. यातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले कोणते देश या संपूर्ण विषयावर राज्य करतील हा विचार केला असता भारत देश संपूर्ण जगाचा विश्वगुरू होईल, असे उद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी काढले.
जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना झालेल्या चकमकीत रात्री साडेदहाच्या सुमारास वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज (रविवारी) बामणोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
कलेढोण येथील मुख्य बाजारपेठेत असणारे किसन पावणे (रा. गारुडी, ता. खटाव) यांचे पूजा ज्वेलर्स चोरट्यांनी फोडून २० ग्रॅम सोने, पाच किलो चांदीची मोड व नवीन चार किलो चांदी असा चार लाख ७३ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलिस तपास करत आहेत.
आदर्की बुद्रुक, ता. फलटण येथील एका घरात महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील जोडवी असे दीड तोळे सोने घेऊन चोरट्याने पलायन केले. याबाबतची फिर्याद सौ. रंजना संपत बर्गे वय ४५ यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिल्यानंतर अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.