स्वामी समर्थ गुरुपीठ सेवेकऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
विनाकारण बदनामी करणार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात विनाकारण बदनामी करणारे अमर रघुनाथ पाटील राहणार शिवाजीनगर पुणे व चंद्रकांत गणपत पाठक राहणार त्रंबकेश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गुरू पिठाच्या वतीने साताऱ्यात हनुमंत लांडे, राजेश पवार आणि महेंद्र बाजारे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
सातारा : श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात विनाकारण बदनामी करणारे अमर रघुनाथ पाटील राहणार शिवाजीनगर पुणे व चंद्रकांत गणपत पाठक राहणार त्रंबकेश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गुरू पिठाच्या वतीने साताऱ्यात हनुमंत लांडे, राजेश पवार आणि महेंद्र बाजारे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
यासंदर्भात साताऱ्यातील गुरूपीठ (श्री स्वामी समर्थ दिंडोरी) सेवेकर्यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद आहे की, अमर पाटील व चंद्रकांत पाठक यांनी त्र्यंबकेश्वर येथे गुरूपीठाने बेकायदेशीर जमीन खरेदी करून 50 कोटीचा अपहार केला आहे, अशी काही चुकीची माहिती प्रसारमाध्यमांवर पसरवून संबंधितांनी गुरु भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ गुरुपीठ गेल्या 75 वर्षांपासून आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. त्यामुळे गुरु पिठाची विनाकारण बदनामी होत आहे. संस्थेच्या कारभारामध्ये कोठेही गैरप्रकार झाला नसल्याचा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आहे. असे असताना विनाकारण बदनामी करणाऱ्या पाटील आणि पाठक यांच्या विरोधात पोलिसांनी सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद करावी, अशी मागणी सेवेकरी पिठाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्रातून ठिकठिकाणी सह्यांची मोहीम घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणार असल्याचे राजेश पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. सातारा जिल्ह्यामध्ये 18 केंद्रे स्वामी समर्थ गुरुपीठ याची असून त्या माध्यमातून दीड लाख भक्त अध्यात्मिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे गुरु पिठाची बदनामी आम्ही खूप कदापि खपवून घेणार नाही. या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.