सातारा जिल्हा न्यायालयासमोर बोलेरो कारची दुचाकीला धडक बसून दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली.
जिल्हा पोलीस प्रमुखांनी कराड येथील दोघाजणांना तडीपारीचे आदेश पारित केले आहेत.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांच्यावतीने मठाधिपती प. पु. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते येथील संजीवनी हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉ. अंबादास कदम व त्यांच्या पत्नी संजीवनी कदम यांना टाईम सायबर मीडिया यांच्या वतीने ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट स्त्री रोग तज्ञ म्हणून जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते सत्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सातारा पालिकेच्या पंचवीस प्रभागांची आरक्षणं सोडतीद्वारे येथील शाहू कला मंदिर येथे जाहीर झाली. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे पन्नास जागांसाठी पंचवीस महिला व पंचवीस पुरूषांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे.
फोन करुन बोलवले असता गेले नसल्याच्या कारणातून चिडून जावून चौघांनी एकास मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरोडा टाकण्याच्या तयारीने आलेल्या परप्रांतियांच्या टोळीला लोणंद पोलिसांनी शिताफीने ताब्यात ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण रोख रक्कम, इतर ऐवज व मोटरसायकल आणि हत्यारे ताब्यात घेण्यात आली आहेत. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्रीनाथ हरिभाऊ कदम यांनी फिर्याद दिली आहे.
बांबवडे, तालुका पाटण येथील गायमुख वाडी मार्गावर खडखडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना 10 जून रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. या प्रकरणी विजय शहाजी पवार वय 51 यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सातारा येथे दुकानावर दगडफेक का केली, याचा जाब विचारण्याच्या रागातून तिघांनी दुकान चालकाच्या भावाला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 10 जून रोजी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडली.
जळणाचे साहित्य उचलण्यास विरोध केला म्हणून चौघांनी रिक्षाचालकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना करंजे पेठ येथे घडली आहे. ही घटना 11 जून रोजी सायंकाळी साडे दहाच्या दरम्यान घडली आहे.
पोवई नाक्यावरील जिल्हा रुग्णालय मार्गावर सेंट पॉल शाळेच्या परिसरात 37 वर्षीय इसमाला एका अज्ञात युवकाने लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्याकडील पंधराशे रुपये रोख रक्कम आणि त्याचे एअरटेल कंपनीचे सिम कार्ड चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार दिनांक 10 जून रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान घडला आहे.