सातारा जिल्हा न्यायालयासमोर बोलेरो कारची दुचाकीला धडक बसून दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली.
सातारा : सातारा जिल्हा न्यायालयासमोर बोलेरो कारची दुचाकीला धडक बसून दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी बोलेरो चालकाविरुध्द राहूल व्यंकट काळे (वय 32, रा. खिंडवाडी ता.सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अपघातात तक्रारदार व त्यांची आई जखमी झाल्या आहेत. ही घटना दि. 11 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


