maharashtra

किरकोळ कारणावरून करंजे पेठेत एकास दांडक्याने मारहाण


A man was beaten with a stick in Karanje Peth for a minor reason
जळणाचे साहित्य उचलण्यास विरोध केला म्हणून चौघांनी रिक्षाचालकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना करंजे पेठ येथे घडली आहे. ही घटना 11 जून रोजी सायंकाळी साडे दहाच्या दरम्यान घडली आहे.

सातारा : जळणाचे साहित्य उचलण्यास विरोध केला म्हणून चौघांनी रिक्षाचालकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना करंजे पेठ येथे घडली आहे. ही घटना 11 जून रोजी सायंकाळी साडे दहाच्या दरम्यान घडली आहे.
या प्रकरणी संतोष गणपतराव बोराटे वय 51 राहणार 84 करंजे पेठ यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रम बोराटे, सुमित बोराटे, निर्मला बोराटे सर्वजण राहणार करंजे पेठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बोराटे यांना त्यांच्या जागेत ठेवलेले लाकडी साहित्यांचे जळण उचलण्यास संबंधितांनी सांगितले. त्यावेळी बोराटे यांनी त्यास नकार दिला. तेव्हा चौघांनी फिर्यादी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच निर्मला बोराटे यांनी तेथील लाकडी दांडक्याने बोराडे यांच्या डोक्यात मारहाण करून त्यांना जखमी केले. या प्रकरणाचा पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करत आहेत.