दरोडा टाकण्याच्या तयारीने आलेल्या परप्रांतियांच्या टोळीला लोणंद पोलिसांनी शिताफीने ताब्यात ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण रोख रक्कम, इतर ऐवज व मोटरसायकल आणि हत्यारे ताब्यात घेण्यात आली आहेत. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्रीनाथ हरिभाऊ कदम यांनी फिर्याद दिली आहे.
सातारा : दरोडा टाकण्याच्या तयारीने आलेल्या परप्रांतियांच्या टोळीला लोणंद पोलिसांनी शिताफीने ताब्यात ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण रोख रक्कम, इतर ऐवज व मोटरसायकल आणि हत्यारे ताब्यात घेण्यात आली आहेत. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्रीनाथ हरिभाऊ कदम यांनी फिर्याद दिली आहे.
मौजे नेवसे वस्ती (पाडेगाव), तालुका फलटण गावच्या हद्दीत पाडेगाव येथील जाणाऱ्या मार्गावर पोलिसांना हे संशयित इसम आढळून आले आहेत. महंमदअली रमजानअली वय 32 राहणार सुरत गड जिल्हा सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश सध्या राहणार बाळू पाटलाची वाडी, मोहम्मद इमरान अब्दुल रा. मोहितनगर ता. सुरतगड जिल्हा सिद्धार्थनगर, शिवा संत भगवानदास कनोजिया राहणार डुबरी, तालुका तुलसीपुर, राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार बाळू पाटलाची वाडी, फक्रुद्दीन बहादूर खान वय 20 राहणार पिंपरी सध्या राहणार बाळू पाटलाची वाडी, आलम सौद खान वय 42 राहणार रोमन देही सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांच्याकडून लोखंडी दोन पान्हे, लोखंडी गज, एम आय कंपनीचा एक मोबाईल, रोख तीनशे रुपये, लोखंडी सुरा, लोखंडी पक्कड, दहा हजार रुपये कंपनीचा मोबाईल आणि स्प्लेंडर मोटर सायकल मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. मोटारसायकली व अवजारे दरोडा घालण्याच्या उद्देशाने आपण बाळगण्याचे संबंधित संशयितांनी सांगितल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे.