lonandpolicearrestgangofforeignerspreparingtocommitrobbery

esahas.com

दरोडा टाकण्याच्या तयारीतील परप्रांतीयांची टोळी लोणंद पोलिसांच्या ताब्यात

दरोडा टाकण्याच्या तयारीने आलेल्या परप्रांतियांच्या टोळीला लोणंद पोलिसांनी शिताफीने ताब्यात ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण रोख रक्कम, इतर ऐवज व मोटरसायकल आणि हत्यारे ताब्यात घेण्यात आली आहेत. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्रीनाथ हरिभाऊ कदम यांनी फिर्याद दिली आहे.