maharashtra

किरकोळ कारणावरून भोंदवडे येथे दुकान चालकाला मारहाण


Shopkeeper beaten at Bhondwade for petty reasons
सातारा येथे दुकानावर दगडफेक का केली, याचा जाब विचारण्याच्या रागातून तिघांनी दुकान चालकाच्या भावाला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 10 जून रोजी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडली.

सातारा : सातारा येथे दुकानावर दगडफेक का केली, याचा जाब विचारण्याच्या रागातून तिघांनी दुकान चालकाच्या भावाला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 10 जून रोजी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडली. याप्रकरणी साहिल भरत सूर्यवंशी वय 19 राहणार लांडेवाडी तालुका खटाव सध्या राहणार भोंदवडे ता सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोमनाथ घोरपडे, राहणार पोगरवाडी प्रतीक पाटील, प्रतीक माने, मयूर घाडगे, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीचा भाऊ अक्षय याने प्रतीक पाटील याला दुकानावर दगडफेक का केली, असे विचारले असता याचा राग येऊन प्रतीक आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मयूर यांनी रोडवर पडलेल्या लोखंडी रॉडने भाऊ अक्षय याला डोक्यात मारहाण करून जखमी केले आहे पोलीस हवालदार महागडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.