maharashtra

डॉ. अंबादास कदम यांचे कार्य वैद्यकीय क्षेत्रापेक्षाही उज्वल : प.पू. सुंदरगिरी महाराज


Dr. Ambadas Kadam's work is brighter than medical field: HH Sundaragiri Maharaj
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांच्यावतीने मठाधिपती प. पु. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते येथील संजीवनी हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉ. अंबादास कदम व  त्यांच्या पत्नी संजीवनी कदम यांना टाईम सायबर मीडिया यांच्या वतीने ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट स्त्री रोग तज्ञ म्हणून जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते सत्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

पुसेगाव : श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांच्यावतीने मठाधिपती प. पु. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते येथील संजीवनी हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉ. अंबादास कदम व  त्यांच्या पत्नी संजीवनी कदम यांना टाईम सायबर मीडिया यांच्या वतीने ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट स्त्री रोग तज्ञ म्हणून जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते सत्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यास अनुसरून पुसेगाव सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे नूतन चेअरमन बाळासाहेब जाधव, विश्वस्त गौरव जाधव, माजी विश्वस्त सुरेश शेठ जाधव, संदीप जाधव, राम जाधव आदी उपस्थित होते.
या सत्कार समयी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज म्हणाले  समाजामध्ये आपण माणूस म्हणून जगत असताना खर्‍या अर्थाने माणूस म्हणून आपले काही कर्तव्य असते कर्तव्याला जिवंत ठेवून डॉ. अंबादास कदम यांनी एक वेगळीक निर्माण केली आहे. माझ्यासह गोरगरिबांची सेवा वैद्यकीय क्षेत्रासह, सामाजिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सेवा चालू ठेवली आहे. कुठल्याही प्रकारचा पैशाचा विचार न करता माझ्या बरोबर इतर रुग्णालाही अनुभव आले आहेत आणि म्हणूनच त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.
पुसेगाव पंचक्रोशीमधील स्त्री रोग तज्ञ म्हणून डॉ. अंबादास कदम यांची फार मोठी ख्याती झाली आहे. त्यांच्या कार्याचा मोबदला म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये संपूर्ण जगामध्ये ज्याचे नाव आहे हे क्रिकेटपटू सुनील गावस्कर अशा व्यक्तीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशा आमच्या पुसेगाव येथील डॉ. अंबादास कदम यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावलौकिक कमावला आणि पुसेगाव चे नाव उज्वल केले. याची दखल घेऊन आज देवस्थान ट्रस्टच्या वतीने डॉ. अंबादास कदम व त्यांची पत्नी संजीवनी कदम यांचा सत्कार व अभिनंदन करीत आहोत. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. त्याबद्दल त्यांना मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे नूतन चेअरमन संतोष जाधव उर्फ बाळासाहेब जाधव यांच्यावतीने सत्कार करून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.