maharashtra

पोवई नाक्यावर एकाची अज्ञातांकडून लूटमार


One robbed by unknown persons at Powai Naka
पोवई नाक्यावरील जिल्हा रुग्णालय मार्गावर सेंट पॉल शाळेच्या परिसरात 37 वर्षीय इसमाला एका अज्ञात युवकाने लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्याकडील पंधराशे रुपये रोख रक्कम आणि त्याचे एअरटेल कंपनीचे सिम कार्ड चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार दिनांक 10 जून रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान घडला आहे.

सातारा : पोवई नाक्यावरील जिल्हा रुग्णालय मार्गावर सेंट पॉल शाळेच्या परिसरात 37 वर्षीय इसमाला एका अज्ञात युवकाने लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्याकडील पंधराशे रुपये रोख रक्कम आणि त्याचे एअरटेल कंपनीचे सिम कार्ड चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार दिनांक 10 जून रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान घडला आहे.
या प्रकरणी सुरेश महामुनी राहणार कृष्णामाई हाउसिंग सोसायटी, संगमनगर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामुनी हे जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने रात्रीत जात असताना 25 वयोगटातील एक अज्ञात इसम मागून आला. त्याने मागील बाजूने त्यांच्या डोक्यात व पाठीत लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना दुखापत केली. या वेळी झालेल्या झटापटीत त्याने त्यांच्या खिशातील पंधराशे रुपये रोख, स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड, एअरटेल कंपनीचे सिम कार्ड जबरदस्तीनं चोरून नेले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. माने करत आहेत.