जिल्हा पोलीस प्रमुखांनी कराड येथील दोघाजणांना तडीपारीचे आदेश पारित केले आहेत.
सातारा : जिल्हा पोलीस प्रमुखांनी कराड येथील दोघाजणांना तडीपारीचे आदेश पारित केले आहेत.
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, हाताने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगळे असे शरीराविरुद्ध व मालमत्ते विरुद्ध गंभीर गुन्हे करणार्या टोळीचा प्रमुख श्रीधर काशिनाथ थोरवडे वय- २४, अतिश सुनील थोरवडे वय-२२ दोघे रा. बुधवार पेठ कराड, ता. कराड यांच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. या टोळीस जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.
या टोळीतील लोकांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यावर वरील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारे समाजामध्ये दहशत माजविणार्या समाजात बेकायदेशीर कारवाया करणार्या टोळ्यांविरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू आहे. जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून ३५ प्रस्तावातील बेकायदेशीर कारवाया करणारे १३४ इसमांना तडीपारीचे आदेश दिले आहेत. याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस यांनी योग्य पुरावे सादर केले. या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.