महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

येथील बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

रामनगर येथे युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार

रामनगर, ता. सातारा येथे शुक्रवारी रात्री तेथीलच एक युवक शतपावली करत असताना रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटल्याच्या कारणावरून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. यामध्ये संबंधित युवक कौशल बेबले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

दोन तडीपार गुन्हेगारांना कराड परिसरात अटक

सातारा जिल्हा आणि लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुका हद्दीतून सहा महिन्या करता तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड एसटी स्टँड परिसरातून अटक केली.

esahas.com
महाराष्ट्र

रिमांड होम मधून अल्पवयीन मुलाने काढला पळ

एका गुन्ह्यात ताब्यात घेतलेला तेरा वर्षाचा विधिसंघर्षग्रस्त शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निरीक्षणगृहातून पळून गेला. या घटनेमुळे निरीक्षणगृहात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलाचा निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता तो आढळून आला नाही.

esahas.com
महाराष्ट्र

शासकीय कामात अडथळा आणून महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग; एकजण अटकेत

सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून इतर पाचजणांचा शोध सुरु आहे. संजय विनायक गायकवाड (वय 57, रा. पाचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

esahas.com
महाराष्ट्र

ठेकेदारांची अडकली साडेचार कोटी रुपयांची बिले

सातारा पालिकेच्या तिजोरीत वसुलीचा वेग मंदावल्याने पुरता खडखडाट झाला आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले काढताना लेखा विभागाची प्रचंड कसरत होत असून ठेकेदारांच्या गर्दीमुळे येथील कर्मचारी घायकुतीला आले आहेत. प्राप्त माहितीनुसार तब्बल साडेचार कोटी रुपयांची बिले ठेकेदारांची अडकून पडली आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

वाढे सोसायटीत ६0 लाखाचा अपहार

वाढे, ता. सातारा येथील सोसायटीत सभासदांची फसवणूक आणि विश्वासघात करुन सुमारे साठ लाख रुपयांचा अपहार केला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कार-दुचाकी अपघातात एकजण जखमी

पारंबी, ता. सातारा गावच्या हद्दीत कारने दुचाकीला धडक देऊन एकाला जखमी करून दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

तीन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यांवर छापे; 52 हजार 758 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणार्‍या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी दुचाकीसह 52 हजार 758 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

esahas.com
महाराष्ट्र

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

मोबाइल कंपनीच्या सर्विसिंग सेंटरमधील स्पेअर पार्ट विकून 6 लाख 18 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.