सातारा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणार्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी दुचाकीसह 52 हजार 758 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सातारा : सातारा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणार्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी दुचाकीसह 52 हजार 758 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा येथील शिवराज पेट्रोल पंपासमोर एका पानपट्टीच्या आडोशाला विशाल कल्याण जाधव, वय 29, रा. आरे, ता. सातारा हा जुगार घेताना आढळून आला त्याच्याकडून 8 हजार 213 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. वजरोशी, ता. पाटण गावच्या हद्दीत एका मंदिराच्या जवळ आंब्याच्या झाडाखाली बाळू दिनकर टोळे, सुहास दादासो रांजणे , मुरलीधर भास्कर धोत्रे, बाजीराव शंकर डफळे, भानुदास राजाराम रांजणे सर्व रा. वजरोशी यांच्याकडून 3 हजार 50 रुपये, आवार्डे, तालुका पाटण गावच्या हद्दीत पिंपळाच्या झाडाखाली तेथीलच प्रदीप नारायण सावंत, नंदकुमार बाबुराव काटे, रमेश तात्याबा खामकर, तुकाराम धोंडीराम गुरव यांच्याकडून 1 हजार 530 रुपये रोख रक्कम, 40 हजार रुपयांची दुचाकी मोबाइल व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.


