maharashtra

बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकावर गुन्हा


Offense against reckless driving
येथील बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१० जून रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सातारा बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय मार्गावर खलील मोमीन, वय ४०, रा. किन्हई, ता. कोरेगाव हे आपल्या ताब्यातील दुचाकी बेदरकारपणे, वेडीवाकडी चालवत असताना आढळून आल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल रफिक मुलाणी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.