maharashtra

शासकीय कामात अडथळा आणून महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग; एकजण अटकेत


Molestation of female police personnel by obstructing government work; One arrested
सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून इतर पाचजणांचा शोध सुरु आहे. संजय विनायक गायकवाड (वय 57, रा. पाचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून इतर पाचजणांचा शोध सुरु आहे. संजय विनायक गायकवाड (वय 57, रा. पाचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या महिला पोलीस कर्मचारी आणि एक पुरुष कर्मचारी काल दि. 10 रोजी रात्री शहर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. यावेळी वाढे फाटा हद्दीमध्ये काहीजणांच्या स्कॉर्पिओ गाडीने पोलीस गाडीला धडक दिली. यावेळी याचा जाब विचारण्यासाठी उतरलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍यास या सहाजणांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. याबाबतची फिर्याद संबंधित महिला कर्मचार्‍याने तालुका पोलीस ठाण्यात दिली असून या सहाजणांपैकी एकास अटक करण्यात आली आहे. उर्वरित पाचजणांचा पोलीस शोध घेत आहेत.