maharashtra

जिल्ह्यात तीन जुगार अड्डयांवर छापे


Raids on three gambling dens in the district
सातारा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ४१ हजार ७२८ रुपये रोख रक्कम, एक दुचाकी व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

सातारा : सातारा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ४१ हजार ७२८ रुपये रोख रक्कम, एक दुचाकी व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील जुना मोटर स्टँड परिसरात असणाऱ्या सुमित्राराजे व्यापारी संकुलाच्या पाठीमागे एका बोळामध्ये हुमेश पठाण व अन्य एक जण (नाव समजू शकले नाही) हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून ३४ हजार ४३४ रुपये रोख व एक मोबाइल हस्तगत करण्यात आला. दुसऱ्या घटनेत तळमावले, ता. पाटण गावच्या हद्दीत एका वडापाव सेंटरच्या पाठीमागे प्रथमेश दिनकर सपकाळ रा. खळे, ता. पाटण याच्याकडून ७०० रुपये रोख रक्कम तर तिसऱ्या घटनेत कराड येथील मार्केट यार्ड गेट नंबर एक समोरील एका मंदीराच्या आडोशाला नागेश गोळसंघी रा. मलकापूर, ता. कराड याच्याकडून ६ हजार ६०५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.