पारंबी, ता. सातारा गावच्या हद्दीत कारने दुचाकीला धडक देऊन एकाला जखमी करून दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : पारंबी, ता. सातारा गावच्या हद्दीत कारने दुचाकीला धडक देऊन एकाला जखमी करून दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 जून रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पारंबी गावच्या हद्दीत रेड फॉर्ड हॉटेलच्या जवळ असणार्या मार्गावर अज्ञात कार चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत कुणाल विनोद जाधव, वय 14, रा. अटाळी, ता. सातारा हा जखमी झाला. अपघातानंतर अज्ञात कारचालक निघून गेल्याची तक्रार पिंटू वामन जाधव याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.


