फोन करुन बोलवले असता गेले नसल्याच्या कारणातून चिडून जावून चौघांनी एकास मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : फोन करुन बोलवले असता गेले नसल्याच्या कारणातून चिडून जावून चौघांनी एकास मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
योगेश वायदंडे, पप्पू चव्हाण, चिक्या चव्हाण, ऋषी बडेकर (चौघे रा. सातारा शहर परिसर) यांच्या विरुध्द अभिषेक महेश बडेकर (वय 22, रा. मंगळवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 10 रोजी करंजे येथे घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


