येथील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच एकाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील विसावा नाका (पिरवाडी), ता. सातारा व येथील खेड फाटा परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील मोळाचा ओढा परिसरात दारुच्या नशेत पडून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सांगवी, ता. कोरेगाव येथील एका युवतीने विषारी औषध प्राशन केल्याने तिचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा हद्दीत अजंठा चौक परिसरात असणार्या उड्डाण पुलाला भगदाड पडले असल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकू लागल्याने एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षात मात्र या महामार्गाच्या देखभालीचे काम करणार्या रिलायन्स कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हा दावा फेटाळून लावत पावसाळ्याच्या दिवसात नियमितपणे केले जाणारे हे काम असल्याचे सांगितले.
सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्यावर कडकडीत बंद लादण्यात आला आहे . जर कोणी पीओपीच्या मुर्त्या करताना सापडले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे पीओपी मूर्ती बनवणाऱ्या कारागीर यांना तब्बल 15 कोटी रुपयांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
बांधावरुन जाण्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केल्याने एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. मिरा बाळु कांबळे रा. कोंडवे ता. सातारा असे त्यांचे नाव आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
शनिवार पेठ, सातारा येथे राहत असलेली विवाहिता बेपत्ता झाल्याने तिच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्रामद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एका युवतीला ताब्यात घेण्यात आले आहे. पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या या टोळीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात आले.