सातारा शहरालगत बोगदा ते शेंद्रे मार्गावर कुरणेश्वर गणपती मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या दुर्मिळ वनौषधी उद्यानात गुस्ताविया ऑगस्टस म्हणजेच स्वर्गीय कमळ उमलले आहे. या फुलाचे सौंदर्य आणि वैशिष्टय साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक उमेश करंबेळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे शेअर केले आहे.
जिल्ह्यातील दोन ठिकाणी सुमारे 70 किलो वजनाच्या 40 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारेची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली असल्याची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहरात अंमली पदार्थ विक्री प्रकरणी एका महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड येथील दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तासवडे टोल नाका, ता. कराड परिसरात जबरी चोरी केल्याप्रकरणी दोन तृतीयपंथीयांवर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फलटणमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे 49 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
गळ्यातील गंठण चोरी केल्याप्रकरणी कालेटेक, ता. कराड येथील एका महिलेवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुरसाळे, ता. खटाव गावच्या हद्दीतील थोरल्याचा मळा येथुन एका दुचाकीची अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील बुधवार नाका परिसरात शाहूपुरी पोलिसांनी सर्व्हिसिंग सेंटरच्या पाठीमागे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा मारून एकूण 6 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 1 लाख 51 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.