गुरसाळे, ता. खटाव गावच्या हद्दीतील थोरल्याचा मळा येथुन एका दुचाकीची अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : गुरसाळे, ता. खटाव गावच्या हद्दीतील थोरल्याचा मळा येथुन एका दुचाकीची अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 जुलै रोजी दुपारी 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान गुरसाळे, ता. खटाव गावच्या हद्दीतील थोरल्याचा मळा येथुन धोंडीराम रंगराव कणसे यांची स्प्लेंडर प्लस कंपनीची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक एम एच 11 सीई 5674 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद पंकज संजय देशमुख वय 22 रा. गोपुज, ता. खटाव यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.


