येथील वाई पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाबळेश्वरातून चोरीला गेलेल्या पाच हिरो होंडा स्प्लेंडर व एक बुलेट अशा सहा दुचाक्या जप्त केल्या असून दोघांना अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या कारवाईचे जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी कौतुक केले आहे.
कोयनानगर येथील बसस्थानकाजवळ डिस्कवर कोयना पथकाच्या सदस्यांना दुर्मिळ असणारा पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप आढळला. या सापाची मादी पावसाळ्यात तीन ते सहा अंडी घालते. हा साप दुर्मिळ असल्यामुळे या सापाच्या दंशाचे प्रमाणही कमी आहे. याचा दंश झाल्यास त्या ठिकाणी जळजळ होऊन सूज येणे व श्वास घेण्यास अडचण होणे ही लक्षणे दिसून येतात.
एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढवणे, सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपानाचे प्रमाण वाढविणे व बाळाच्या सहा महिन्यानंतर दोन वर्षापर्यंत बाळाला आईच्या दूधाबरोबर वरचा आहार याचे प्रमाण वाढविणे यासाठी मिशन धाराऊ मातादुग्धामृतम् ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी वीज कर्मचारी अनेक अडचणीवर मात करतात. त्यांच्यामुळेच आपल्याला अखंडित वीज उपलब्ध होते. आज विजेची मागणी वाढत असून, ती पूर्ण करण्यात महावितरण यशस्वी झाल्याचे सांगताना जिल्ह्यातील वीज विकासाच्या कामात पूर्ण योगदान देणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या आरोग्य उपक्रम आणि सुविधांकरिता खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. त्यांच्याकडे तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. या भेटीच्या वृत्तांत जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आला आहे.
मुंबईचे व्यापारी सोने खरेदी करुन अकलुज येथील त्यांच्या पेढीत निघाले असता म्हसवड नजिक दोन दुचाकींवरुन आलेल्या लुटारुंनी त्यांना पिस्तुलाच्या धाकाने लुटले. या लुटमारीत सुमारे 20 लाखांचे सोने लुटून चोरट्यांनी पोबारा केला आहे.
मोबाईल चोरीच्या व हरवल्याच्या तक्रारींचे निवारण करताना सातारा सायबर पोलीस ठाण्यातील नेमण्यात आलेल्या खास पथकाने 13 लाख रुपये किंमतीचे 82 मोबाईल तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून ते नागरिकांना परत करण्यात यश मिळवले असून नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
येथील पारंगे चौक ते पोवई नाका मार्गावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फरांदवाडी, ता. फलटण येथून अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
वाठार स्टेशन, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकला.