शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जुगार अड्ड्यावर छापा
सहा जणांवर अटकेची कारवाई ; 1 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
येथील बुधवार नाका परिसरात शाहूपुरी पोलिसांनी सर्व्हिसिंग सेंटरच्या पाठीमागे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा मारून एकूण 6 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 1 लाख 51 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सातारा : येथील बुधवार नाका परिसरात शाहूपुरी पोलिसांनी सर्व्हिसिंग सेंटरच्या पाठीमागे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा मारून एकूण 6 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 1 लाख 51 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत सातारा येथील बुधवार नाका, सर्व्हिसिंग सेंटरच्या पाठीमागे तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री केल्यानंतर पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने बुधवार नाका येथील सर्व्हिसिंग सेंटरच्या पाठीमागे अचानकपणे दुपारी छापा टाकला. तेव्हा अवैध तीन पानी मटका जुगार चालू असल्याचे आढळून आले. संबंधित इसमांकडून अवैध जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट व दुचाकी असा 1 लाख 51 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध जुगार खेळत असल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रवींद्र शंकर आवळे वय 35, रा. बुधवार पेठ, सातारा, शामराव यशवंत कुऱ्हाडे रा. नामदेव वाडी झोपडपट्टी, सातारा, मनोज संपत माने वय 49 रा. बुधवार पेठ, सातारा, रामा यमनप्पा देऊर रा. सातारा, दिलीप प्रभाकर गायकवाड, मेहर देशमुख रा. कॉलनी करंजे, सातारा, कल्याण मारुती खवले रा. सिटी कोर्ट बिल्डिंगच्या पाठीमागे, मोळाचा ओढा, सातारा या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या कारवाईमध्ये हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, निलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी सहभाग घेतला.


