maharashtra

वीजपुरवठ्यासाठी कर्मचाऱ्यांची अडचणींवर मात : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

सातारा येथे उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य महोत्सव

Employees overcame difficulties for power supply: Collector Ruchesh Jayavanshi
ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी वीज कर्मचारी अनेक अडचणीवर मात करतात. त्यांच्यामुळेच आपल्याला अखंडित वीज उपलब्ध होते. आज विजेची मागणी वाढत असून, ती पूर्ण करण्यात महावितरण यशस्वी झाल्याचे सांगताना जिल्ह्यातील वीज विकासाच्या कामात पूर्ण योगदान देणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

सातारा : ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी वीज कर्मचारी अनेक अडचणीवर मात करतात. त्यांच्यामुळेच आपल्याला अखंडित वीज उपलब्ध होते. आज विजेची मागणी वाढत असून, ती पूर्ण करण्यात महावितरण यशस्वी झाल्याचे सांगताना जिल्ह्यातील वीज विकासाच्या कामात पूर्ण योगदान देणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ महोत्सव महाराष्ट्रासह देशभरात राबविला जात आहे. त्यानिमित्त आज (दि. २९) सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात महावितरण व एनटीपीसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, एनटीपीसीचे मुख्य महाप्रबंधक एन. श्रीनिवासनराव, महावितरणचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. संसदेच्या अधिवेशनामुळे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व खा. श्रीनिवास पाटील उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी व्हीडीओ संदेशाच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक करताना अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी सातारा जिल्ह्यात मागील आठ वर्षात राबविलेल्या शासकीय योजनांवर प्रकाश टाकला. केंद्र सरकारच्या पंडीत दिनदयाल उपाध्याय, सौभाग्य, एकात्मिक विद्युत विकास, कुसुम तसेच राज्यशासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, सौरपंप, उच्चदाब वितरण प्रणाली आदी योजना मोठ्या प्रमाणावर राबविल्या गेल्या आहेत. या योजनांमुळे शहरी व ग्रामीण वीज यंत्रणा भक्कम करण्याचे व वंचित घटकांना प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या हातून झाले आहे. तर तसेच कृषी धोरण राबवून शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्याचे काम सुद्धा महावितरणने केले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांवर आधारित विविध चित्रफिती यावेळी दाखविण्यात आल्या. तर वीजचोरी हा एक कलंक असल्याचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. विविध योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तर अरविंद कृष्णात शिंदे व शिवाजी आनंदराव कदम या शेतकऱ्यांनी आपले प्रातिनिधीक मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंते मकरंद आवळेकर, रविंद्र बुंदेले, सागर मारुलकर, संजय सोनवलकर, डॉ. अमित बारटक्के, सोमनाथ मुंडे व किरण सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उपव्यवस्थापक संतोष भोसले यांनी केले तर उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाघ यांनी आभार मानले. यावेळी लाभार्थी वीज ग्राहक, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.