maharashtra

अंमली पदार्थ विक्री प्रकरणी एका महिलेवर गुन्हा


सातारा शहरात अंमली पदार्थ विक्री प्रकरणी एका महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा शहरात अंमली पदार्थ विक्री प्रकरणी एका महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 28 जुलै रोजी संध्याकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील राजलक्ष्मी टॉकीजच्या पाठीमागील बाजूस सायरा ख्वाजा खान वय 56, रा. शनिवार पेठ, सातारा ही महिला 340 ग्रॅम वजनाच्या गांजाच्या प्लास्टिक व कागदी पुड्या विक्री करताना आढळून आली. तिच्याकडून 670 रुपये रोख आणि गांजा असा एकूण 4 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.