maharashtra

सातार्‍याचे सुपुत्र न्या. रणजित मोरे 'कॅट'चे नवे अध्यक्ष


महाराष्ट्रातील सातारा जिह्याचे सुपुत्र न्यायमूर्ती रणजित वसंतराव मोरे हे केंद्रीय प्रशासकीय लवादाचे (कॅट) नवीन अध्यक्ष बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी न्यायमूर्ती मोरे यांची पॅटच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. न्यायमूर्ती मोरे हे मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती असून मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी न्यायदानाचे पवित्र कार्य केले आहे.

सातारा : महाराष्ट्रातील सातारा जिह्याचे सुपुत्र न्यायमूर्ती रणजित वसंतराव मोरे हे केंद्रीय प्रशासकीय लवादाचे (कॅट) नवीन अध्यक्ष बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी न्यायमूर्ती मोरे यांची पॅटच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. न्यायमूर्ती मोरे हे मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती असून मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी न्यायदानाचे पवित्र कार्य केले आहे.
सातारा जिह्यातील खटाव तालुक्यातील निमसोड हे न्यायमूर्ती रणजित मोरे यांचे मूळ गाव. येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तसेच सांगलीमध्ये कायदा क्षेत्रातील पदवी मिळवली. पुढे मुंबई विद्यापीठातून एलएलएमचे शिक्षण घेतले. 8 सप्टेंबर 2006 रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले. त्यानंतर मेघालय उच्च न्यायालयात त्यांची बदली झाली. उत्कृष्ट न्यायनिवाडय़ामुळे ऑक्टोबर 2021 मध्ये ते मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनले. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांची आता  'कॅट'च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.