जिल्ह्यातील दोन ठिकाणी सुमारे 70 किलो वजनाच्या 40 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारेची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली असल्याची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : जिल्ह्यातील दोन ठिकाणी सुमारे 70 किलो वजनाच्या 40 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारेची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली असल्याची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 27 जुलै रोजीच्या रात्री 11 ते दि. 28 जुलै रोजीच्या सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान पाडेगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील भवानी माता मंदिरा शेजारील ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील 20 हजार रुपये किमतीची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
दुसर्या घटनेत सालपे, ता. फलटण गावच्या हद्दीतील सातकीवस्ती शेजारील ट्रान्सफॉर्मर फोडून 20 हजार रुपये किमतीची अशी एकूण 40 हजार रुपये किमतीची 70 किलो वजनाची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे याबाबतचा गुन्हा लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.