maharashtra

चोरी प्रकरणी महिलेवर गुन्हा


गळ्यातील गंठण चोरी केल्याप्रकरणी कालेटेक, ता. कराड येथील एका महिलेवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : गळ्यातील गंठण चोरी केल्याप्रकरणी कालेटेक, ता. कराड येथील एका महिलेवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 जुलै रोजी सकाळी 11.30 ते 11.50 वाजण्याच्या दरम्यान पूजा सचिन यादव रा. कालेटेक, ता. कराड हिने 80 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे गळ्यातील गंठण राहत्या घरातून चोरी केले असल्याची फिर्याद पौर्णिमा विकास लादे वय 39, रा. बुधवार पेठ, कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.