महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार!

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरी’बद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते तसेच सहकार राज्यमंत्री ना. बी.एल. वर्मा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे प्रतिनिधी तसेच  इतर मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.  

esahas.com
महाराष्ट्र

महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा दिल्ली दौरा केला. महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले आणि विकास कामांची जी आव्हाने आहेत. त्याकरिता त्यांनी नीती आयोगाकडे प्राधान्य क्रमाने करावयाच्या कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला देशभक्ती आणि देशसेवेची जाज्वल्य परंपरा आहे. जिल्ह्यातील केंद्रीय शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येथे केंद्रीय विद्यालय तातडीने उभारले जावे याकरिता पाच एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सीबीएसई पॅटर्नचे केंद्रीय विद्यालय उभे रहावे, अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली.

esahas.com
महाराष्ट्र

उडतारे येथून दुचाकीची चोरी

उडतारे,  ता. वाई येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रल्हाद उर्फ परल्या रमेश पवार, वय २२, रा. केसरकर पेठ झोपडपट्टी, सातारा असे त्याचे नाव आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा शहरातील दोन जण जिल्ह्यातून तडीपार

सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत विविध गुन्हे करणाऱ्या दोघांना हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी सातारा जिल्ह्यातून सहा महिन्याच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे. ऋतिक जितेंद्र शिंदे,  वय २३, रा. गोडोली,  ता. सातारा आणि अक्षय उर्फ बॉम्बे सुनील जाधव,  वय २८, रा. बसप्पा पेठ, सातारा अशी त्यांची नावे आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

यवतेश्‍वर घाटात तब्बल 700 फूट दरीत कोसळली आल्टो कार

दि. 12 रोजी यवतेश्‍वर घाटातील एका वळणावर एक मारुती आल्टो कार तब्बल 700 फूट दरीत कोसळली. या कारमध्ये सातजण असल्याची माहिती आहे. यांमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर 'धार'

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बहुतांश धरणे ओव्हर फ्लो झाल्यामुळे आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलले. त्यामुळे नदीपात्रात प्रति सेकंद १० हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मोळाचा ओढा परिसरातील सात गाळे पालिकेकडून सील

मोळाचा ओढा ते महानुभाव मठ यादरम्यान अतिक्रमण करणाऱ्या दुकानांपैकी सात दुकाने सातारा पालिकेच्या शहर विकास विभागाने शुक्रवारी सील केले. संबंधित व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला.

esahas.com
महाराष्ट्र

भाजपा आमदार जयकुमार गोरे यांना मायणी प्रकरणात जामीन मंजूर

जयकुमार गोरे यांनी गत महिन्यात अटकपूर्व जामिनासाठी सवोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आधी कोर्टापुढे शरण या मगच जामिनासाठी अर्ज करा असे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार आमदार जयकुमार गोरे प्रक्रिया करुन सातारा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या मायणी प्रकरणात गोरे यांना जामीन मंजूर झाला आहे.