स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त वीरांगना प्रतिष्ठान, सैनिक फेडरेशन, इनरव्हील क्लब आँफ कँम्प सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने देश सेवेत हुतात्मा झालेल्या वीर जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.
सातारा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त वीरांगना प्रतिष्ठान, सैनिक फेडरेशन, इनरव्हील क्लब आँफ कँम्प सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने देश सेवेत हुतात्मा झालेल्या वीर जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवनज्योत हाँस्पिटलच्या डायरेक्टर डाँ. वृंदा कुलकर्णी होत्या. त्यांनी वीर पत्नीना मार्गदर्शन करुन त्यांच्यावतीने आरोग्य सेवा मोफत पुरवण्याची हमी दिली. सैनिक फेडरेशनचे डॉ.संजय लावंड यांनीही मार्गदर्शन करुन प्रत्येक अडचणीत मदतीचे आश्वासन दिले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नेतृत्व करुन सातारा जिल्ह्याचे नाव उज्जवल करणारी धावपट्टु सुदेष्णा शिवणकर, रेल्वे भुसंपादन लढ्याचे प्रवर्तक विकास दिलीप थोरात यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी वीरांगना प्रतिष्ठानच्या संस्थापक-अध्यक्षा गौरी आवळे, सचिव अँड. मनिषा बर्गे, खजिनदार सोनल चराटकर, सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष संजय निंबाळकर, संघटक विलास जगताप, तालुका उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,सैनिक फेडरेशन महिला ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष उर्मिला पवार, तालुका अध्यक्ष श्वेता जाधव, महिला संघटक विद्या बर्गे, कोरेगाव तालुका उपाध्यक्ष रुपाली शिंदे, इनरव्हील क्लबच्या माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन गीता मामणीया, अध्यक्षा अनिता नागोरी, सचिव डॉ मृणालिनी जोशी, माजी अध्यक्ष वैशाली पाटील, सर्व शहीद पत्नी सातारा जिल्ह्यातून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संकेत बाबर याने केले. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय माजी खासदार सुधीर सावंत व सैनिक फेडरेशन महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. अर्चना आघाव यांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या.


