maharashtra

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रल्हाद उर्फ परल्या रमेश पवार, वय २२, रा. केसरकर पेठ झोपडपट्टी, सातारा असे त्याचे नाव आहे.

सातारा : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रल्हाद उर्फ परल्या रमेश पवार, वय २२, रा. केसरकर पेठ झोपडपट्टी, सातारा असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रल्हाद उर्फ परल्या पवार याला दि. २ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले असतानाही तो  दि. ११ रोजी ९.४५ वाजण्याच्या सुमारास खावली, ता. सातारा येथील एका विद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याने पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार पोलीस नाईक विक्रम रामदास माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.