सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना केले निवेदन सादर
सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला देशभक्ती आणि देशसेवेची जाज्वल्य परंपरा आहे. जिल्ह्यातील केंद्रीय शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येथे केंद्रीय विद्यालय तातडीने उभारले जावे याकरिता पाच एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सीबीएसई पॅटर्नचे केंद्रीय विद्यालय उभे रहावे, अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली.
सातारा : सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला देशभक्ती आणि देशसेवेची जाज्वल्य परंपरा आहे. जिल्ह्यातील केंद्रीय शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येथे केंद्रीय विद्यालय तातडीने उभारले जावे याकरिता पाच एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सीबीएसई पॅटर्नचे केंद्रीय विद्यालय उभे रहावे, अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली.
खा. उदयनराजे यांनी प्रधान यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील निवेदन सादर केले. या प्रस्तावाची माहिती जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या निवेदनात नमूद आहे की, सातारा जिल्ह्यातील सैनिक कुटुंबांचा विचार करता केंद्रीय विद्यालय निर्मिती होण्याकरता आमचा तातडीचा आग्रह आहे. जिल्ह्याला सैनिकी परंपरा असल्यामुळे केंद्रीय विद्यालयाची मागणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाचे नोकरीत बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच सशस्त्र दल जवान, केंद्रीय कर्मचारी, शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या आंतरजिल्हा बदल्या यामुळे पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ नयेत याकरिता केंद्रीय विद्यालय संघटन मार्फत येथे केंद्रीय विद्यालय उभारले जावे. याकरिता पाच एकर जागा उपलब्ध आहे.
सातारा येथे केंद्रीय विद्यालय अत्यावश्यक असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या विद्यालयाला सुविधा उपलब्ध करून देता येतील. येत्या जून 2024 च्या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय विद्यालयाची सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे. तसेच आवश्यक स्टाफिंग पॅटर्न मंजूर करण्याकरताही केंद्रीय संघटन प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे., केंद्रीय विद्यालय उभारणीबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.