maharashtra

सातारा शहरातील दोन जण जिल्ह्यातून तडीपार


सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत विविध गुन्हे करणाऱ्या दोघांना हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी सातारा जिल्ह्यातून सहा महिन्याच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे. ऋतिक जितेंद्र शिंदे,  वय २३, रा. गोडोली,  ता. सातारा आणि अक्षय उर्फ बॉम्बे सुनील जाधव,  वय २८, रा. बसप्पा पेठ, सातारा अशी त्यांची नावे आहेत.

सातारा : सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत विविध गुन्हे करणाऱ्या दोघांना हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी सातारा जिल्ह्यातून सहा महिन्याच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे. ऋतिक जितेंद्र शिंदे,  वय २३, रा. गोडोली,  ता. सातारा आणि अक्षय उर्फ बॉम्बे सुनील जाधव,  वय २८, रा. बसप्पा पेठ, सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात ऋतिक शिंदे आणि अक्षय उर्फ बॉम्बे जाधव यांच्या विरोधात गर्दी, मारामारी, आदेशाचा भंग, दुखापत करणे, शिवीगाळ करून दमदाटी, अपहरण करणे, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी त्यांच्या विरोधात  हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
संबंधित दोघांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव होत होता. त्यांच्याकडून हिंसक घटना घडून दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी त्या दोघांनाही सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे. अजय बन्सल यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून आत्तापर्यंत १५१ जणांना तडीपार केले आहे.