गणेश बाप्पांचे आगमन अवघ्या 14 दिवसांवर आले असताना नियम व अटींवर लाउडस्पीकरला परवानगी दिली जाईल. मात्र आवाजाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे शांतता कमिटीमध्ये सातारा पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या या निर्णयावर डॉल्बी चालकांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. दरम्यान, अजून अंतिम बैठक होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने त्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील यांच्या हस्ते आणि उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालिका सौ. कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक तसेच मुख्य कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व सेवक वर्ग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
पाडळी, ता. कराड येथील आठवीत शिकणारा बेपत्ता मुलगा जून महिन्यात अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठीकाणी तपास करीत होती. अखेर दोन महिन्यांनी बेपत्ता मुलगा पंजाबच्या अमृतसरमध्ये पोलिसांना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी बालसुधारगृहात ठेवले आहे.
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्व लपवल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
धनगरवाडी, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने मोबाइल चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्या हॉटेल फुलोराच्या स्नॅक सेंटरमधुन २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी आदित्य यशवंत पिसाळ रा. खेड, ता. सातारा प्रसाद साखरे रा. सदरबाझार, सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
येथील करंजे पेठ परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील करंजे पेठ येथे अज्ञात चोरट्याने घरातून सोन्याची चैन, पाकीट, मोबाइल असा ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
विजेचा धक्का बसून आंबवडे बुद्रुक, ता. सातारा येथील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जिल्हा उद्योग केंद्र व अण्णाभाऊ साठे योजनेतून सबसिडीसह बिनव्याजी कर्ज देतो, असे सांगून ३ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.